Sunday, June 22, 2008

Stages of listening

मागच्या पोस्ट मधे गाणे ऐकण्याच्या modes बद्दल लिहीले होते. तसेच माझ्यामते गाणे ऐकण्याच्या तीन stages/ पायऱ्या आहेत. पहिली पायरी - गाणं आवडणं आणि त्यातील technicalities न कळता/माहीत नसतानाही गाण्यातला भाव तुमच्यापर्यंत पोचणे.उदाहरणार्थ गीतरामायणाचे संगीत हे पूर्णपणे रागसंगीतावर आधारलेले आहे. पण गीतरामायण ऐकताना त्यातील technicalities समजून घ्यायची मुळीच गरज भासत नाही. दुसरे उदाहरण म्हणून किशोरी आमोणकरांची 'सहेला रे' ही बंदिश घेऊ या. त्यातील राग भूप आहे की भूपाचा variant आहे हे समजून घेण्याची गरज भासत नाही. त्याशिवायही तो enjoy करता येतो.
दुसरी पायरी - गाण्याच्या तांत्रिक बाबी समजून गाणे enjoy करणे. यामध्ये मी analytical pleasure मध्ये सांगितलेल्या बहुतेक बाबी येतात. शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्या / समजणाऱ्या काही व्यक्ती या तांत्रिक बाबींमुळे शास्त्रीय संगीतच सर्वश्रेष्ठ आहे असे मानू लागतात. इथे शास्त्रीय संगीत great नाही असे मला म्हणावयाचे नाही. शास्त्रीय संगीतासाठी लागणारी साधना आणि बुद्धिमत्ता ही सोपी गोष्ट नाही. पण त्यामुळे शास्रीय संगीतच सर्वात श्रेष्ठ आणि बाकीचे संगीत कमी दर्जाचे हा विचार मला मान्य नाही. सांगायचा मुद्दा हा की तांत्रिक बाबी कळू लागल्या की त्यातच गुंतून पडून त्यातील गाणे ऐकणे किंवा गाणे enjoy करणे हे बाजूला पडून फक्त तांत्रिक बाबींची चिरफाड करत राहणे हा धोका आहे.
तिसरी पायरी - ही सर्वात वरची आणि अवघड पायरी. गाण्याच्या तांत्रिक बाबी माहीत असूनही तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रित न होऊ देता त्यातील भाव या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. या पायरीवर पोचल्यावर शास्रीय / अशास्रीय / उपशास्रीय हा भेदच मुळी राहत नाही. उरते ते फक्त शुद्ध गाणे. ही पायरीच मुळी वेगळी आहे. आधी गाण्याचा वापर आनंद घेण्यासाठी होत असतो. यामध्ये तो स्वतःचा शोध किंवा तत्सम तत्त्वज्ञानाशी निगडीत विचारांसाठी माध्यम म्हणून होतो. सूर, ताल, लय ही बंधने असूनही ती गळून पडतात. मला वाटतं इथे पोचणारे लोक हे एका अर्थाने योगाची साधना करत असतात आणि ही पायरी म्हणजे त्या साधनेचे फळ आहे. संगीताच्या व्याख्येत असलेला नादब्रम्ह या शब्दाचा अर्थ इथे कदाचित उलगडत असेल. इथे श्रोता किंवा गायक यापैकी कुठल्या भूमिकेत साधक आहे याने फारसा फरक पडत असेल असे मला वाटत नाही.
या ठिकाणी मला कबीराची आठवण होते. मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या कबीर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत कबीराच्या कवितेच्या अवस्था सांगितल्या आहेत. त्यात कबीराच्या सुरुवातीच्या रचना या 'मला चांगलं बनायचंय' किंवा 'मला वाईट गोष्टींपासून दूर रहायचंय' या भावनेशी साधर्म्य सांगणाऱ्या आहेत (उदाहरणार्थ - माया महा ठगनी हम जानी, हिरना समझ बूझ). पण त्याच्या नंतरच्या/शेवटीच्या काळातल्या रचना या परमतत्वाचा साक्षात्कार झाल्यानंतरच्या म्हणजेच आप/ पर असं काही नाहीच, ज्यापासून पळून जायचंय असं काहीच नाही, ज्याला अंगीकृत करायचंय असंही काही नाही अशा स्वरूपाच्या आहेत . या रचनेचे एक उदाहरण म्हणून 'साधो सहज समाधी भली' ही कविता बघता येईल. तर गाणं ऐकणे किंवा शिकणे यामधली तिसरी पायरीची तुलना याच्याशी करता येईल.
वरील उताऱ्याची ( तिसरी पायरी) अवस्था लहान तोंडी मोठा घास अशी झालीय. पण जे वाटत गेलं तसं ते लिहीत गेलो.

3 comments:

अनिकेत said...

छान वर्गीकरण केलंत.

Without classification, only chaos.

ह्या लेव्हल-२ वाल्या लोकांमुळेच बरेच लेव्हल-१ वाले तिकडेच राहतात. उलट लेव्हल-३ वाल्यांमुळे ते वर येतात, नाही?

अनिकेत said...

मागचे पोस्ट्स ही छान आहेत. आपला ऍनॅलिटीकल आणि सरळसोट अप्रोच पाहून फार आनंद झाला. गाणं म्हटलं की लोक उगीचच भलतीच अलंकारिक भाषा अशी वापरतात, की शंका येते यांना खरंच काही कळतं का? ;)

तुम्ही मात्र अगदी ऍनॅलिटीकली लिहीलं आहे.. अभिनंदन

Dhananjay said...

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद अनिकेत! तुम्ही वगैरे नको. 'तू' च बरंय.

level-2 वाले सगळेच संगीत अवघड बनवतात असे नाही. किंबहुना level-3 ची वाट level-2 मधूनच जाते. माझा आक्षेप फक्त अशा level-2 वाल्यांसाठी आहे की जे भारतीय शास्त्रीय संगीत हेच सर्वश्रेष्ठ मानतात, त्याचा फाजील अभिमान बाळगतात व त्यामुळे इतर कोठल्याही संगीतास तुच्छ मानतात.

तुझा blog ही पाहिला. निवांत वाचेन.