आज फेरिले गोरी रंग बसंती चीर
आ रुतुराज कोयलरिया कूके
रंग दे रंगा दे ओ रंगरेजवा
रंग दे रंगा दे ओ रंगरेजवा
आ रुतुराज कोयलरिया कूके
ही कुमारांची गौरी बसंत मधली अप्रतिम बंदिश आहे. सवयीने कुमारांच्या बंदिशीचे शब्द कळतात पण अर्थ बऱ्याच वेळेस लागत नाही. याही बंदिशीच्या वेळेस असंच झालं. यातलं बसंती चीर हे काय प्रकरण आहे कळालं नाही. रुतुराज या उल्लेखामुळे आणि कोकिळेच्या कूजनामुळे तसंच राग बसंताचा मिश्रराग आहे यामुळे बंदिश वसंत ऋतूवर आहे हे अगदीच सहज ओळखता येतं. रंगाचा उल्लेख आहे त्यामुळे कदाचित तिसऱ्या ओळीचाही अर्थ लावता आला असता. पण त्यातही कपडे (रंग टाकुन) रंगव असा आग्रह प्रियकराला नाही तर तो रंगरेजवाला (म्हणजे कपडे रंगवणाऱ्याला - रंगारी) आहे. त्यामुळे या उल्लेखाबद्दल कुतुहल निर्माण झालं.
गुगल बाबा मुळे संदर्भाचा शोध घेणं खूपच सोपं होउन बसलं आहे. फक्त थोडासा वेळ द्यायची तयारी हवी आणि थोडीशी खटपट करायला लागते. तर गुगल वर संदर्भ शोधले तर पहाडी होलीच्या संदर्भात खालील माहिती मिळाली. - "फाल्गुनच्या एकादशीला चीर बंधन असते. या दिवशी मंदिर किंवा गावप्रमुखाच्या घरासमोर खांब रोवून त्यावर अनेक रंगाचे कापड बांधले जाते. यादिवशी मंदिरात रंग खेळल्यानंतरच गाववासी रंग खेळायला सुरुवात करतात" .
या संदर्भामुळे बंदिशीचा संपूर्ण अर्थ कळाला. बंदिश आधीपासून माहिती होतीच पण आता एका नवीन dimension मध्ये बघता येते. एका शांत, रम्य अशा पहाडी खेड्यातील होळीचं चित्र डोळ्यापुढे येतं. कुमारांनी काय पाहून रचना केली असेल ते कळतं. एवढंच, बाकीचं ज्याचं त्याने (किंवा जिचं तिने) गाण्यातून शोधावं.
१. संदर्भ एक - नवभारत टाईम्स मधला लेख
२. संदर्भ दोन - कुमारांचा गौरी बसंत
या संदर्भामुळे बंदिशीचा संपूर्ण अर्थ कळाला. बंदिश आधीपासून माहिती होतीच पण आता एका नवीन dimension मध्ये बघता येते. एका शांत, रम्य अशा पहाडी खेड्यातील होळीचं चित्र डोळ्यापुढे येतं. कुमारांनी काय पाहून रचना केली असेल ते कळतं. एवढंच, बाकीचं ज्याचं त्याने (किंवा जिचं तिने) गाण्यातून शोधावं.
१. संदर्भ एक - नवभारत टाईम्स मधला लेख
२. संदर्भ दोन - कुमारांचा गौरी बसंत
5 comments:
आज पेरीले गोरी रंग बसंतीचीरा
आय रितुराज, कोयलरिया कूके ॥
रंगादे रंगादे अरे रंगरेजरा
आय रितुराज, कोयलरीया कूके ॥
राग गौरीबसंत, ताल त्रिताल, लय मध्य.
आपले व माझे सुर जुळणार तर.
> रंग दे रंगा दे ओ रंगरेजवा
>
परमेश्वराला 'रंगरेजवा' संबोधण्याची पद्धत आहे. या बंदिशीत हा शब्द कुमार गंधर्वांनी दोन अर्थांनी वापरला असेल. एकाच अर्थानी वापरल्या असल्यास 'सृष्टीत आता वसन्ताचे रंग भर' अशा अर्थाची ती आळवणी असू शकेल. 'रंग दे रंगरेजवा' हे कुमारांच्याच मधुमाद सारंगातल्या चीज़ेचं तोंड आहे. कबीरानीही 'रंगरेजवा' शब्द वापरला आहे, असं मी वाचल्याचं आठवतं.
Harekrishnaji and Naniwadekar,
Thanks for the comments.
@Naniwadekar,
It is possible that your interpretation is also true.
माझी आवडती चीज. आज प्रथमच तुमच्या या पोस्टमुळे अर्थ समजला. धन्यवाद.
आज फेरिले गोरी रंग बसंती चीर
आ रुतुराज कोयलरिया कूके
रंग दे रंगा दे ओ रंगरेजवा
आ रुतुराज कोयलरिया कूके
ही बंदिश मी ऐकलेली आहे आणि त्याचा मला उमजलेला अर्थ असा आहे.
हे गोरी ( तरुण स्त्री) आज बसंती ( पिवळ्या) रंगाची साडी नेसून घे (पेहरी ले) /
(कारण) वसंत ऋतू आला आहे आणि कोकिळा कुंजन करत आहे //
हे रंगार्या (माझी साडी) पटकन( दे च्या द्विरुक्तीचा अर्थ ) रंगवून दे /
(कारण) वसंत ऋतू आला आहे आणि कोकिळा कुंजन करत आहे //
रमेश आठवले
Post a Comment