Monday, January 24, 2011

पिया के मिलन की आस

रॅशनल रहायचं ठरवलं किंवा मी रॅशनल आहे असं स्वत:ला सांगितलं तरीही भावूक व्हायला होतंच. त्यांच्या प्रतिभेपुढे आणि कर्तृत्वापुढे मी नतमस्तक आहे. त्यांच्या गाण्याचं किंवा व्यक्तिमत्वाचं वेगळेपण सांगावं असं भरपूर आहे, पण आज इच्छा होत नाही.

कुमार किंवा मन्सूर गेले त्यावेळी मी बऱ्यापैकी लहान होतो व त्यांचं गाणंही त्यावेळी एवढं ऐकलं नव्हतं. पण पार्थिव अस्तित्वाच्या पुढे जाऊन कुमार किंवा मन्सूर आज त्यांच्या गाण्यातून उपलब्ध आहेत आणि माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. भीमसेनांच्या बाबतीत हेच होईल. येणारी बरीच वर्षे मी त्यांना ऐकत राहतील आणि भीमसेन आपल्या अपार्थिव अस्तित्वातून मला भेटत राहतील. "याचसाठी केला होता अट्टहास। शेवटचा दिस गोड व्हावा॥"

1 comment:

साधक said...

भावनेत आम्ही ही सामील आहोत. (धनंजयचा ब्लॉग म्हणजे भीमसेनजींबद्दल बरंच काही असणार असं वाटलं होतं)तुमच्या भावनांना लवकरच लेखणीतून वाट करुन द्याल अशी आशा बाळगतो.