Friday, December 26, 2008

शास्त्रीय संगीत श्रवणातील बदलते trends

बर्याच जणांना माझी ही post आवडणार नाही. कारण त्यामध्ये त्यांच्या शास्त्रीय संगीतातील जी श्रद्धास्थाने आहेत त्यांना धक्का लागू शकतो.

परवाच (मराठी "परवा" - वर्षांपर्यंत मागे जाउ शकतो) पुण्यात शास्त्रीय संगीताचा सवाई गंधर्व महोत्सव झाला. पूर्ण नाही पण बराचसा ऐकला. अगदीच मोजके (२-३) performance माझ्या मनाला भिडले. अगदी गाजलेले म्हणावेत अशा संगीतकारांनीही निराशा केली (किंवा नेहमीच करतात). त्यातून आणि in-general गेल्या काही दिवसांत शास्त्रीय संगीत ऐकण्यात जे बदल मी अनुभवले ते मांडावेसे वाटतात. हे बदल आत्ताच झाले असतील असे नाही पण मला गेल्या २-३ वर्षात प्रकर्षाने जाणवले.

वाद्य किंवा कंठ (vocal) हे एक माध्यम आहे ज्यातून संगीतकार आपले संगीतविचार सांगत असतो. शास्त्रीय संगीताच्या साधनेत दोन गोष्टी आहेत - पहिली माध्यमावरची (किंवा ते वाजवण्याच्या तंत्रावरची) हुकुमत आणि दुसरी स्वतःचे संगीतविचार प्रगल्भ करत जाणं. पहिली गोष्ट जी आहे ती तुलनेने फारशी अवघड नाही. म्हणजे काय, की काही ठराविक वर्षे तंत्राचा रियाज केला की तंत्रावर हुकुमत येऊ शकते. आता ही ठराविक वर्षे कुणासाठी /१०/१५/२०/२५/४० अशी असू शकतात. पण तंत्रावर हुकुमत मिळवणं हे बरंचसं hard work मधून साधु शकतं. पण दुसरी गोष्ट जी आहे - स्वतःचे संगीतविचार प्रगल्भ करत राहणं त्यासाठी मात्र विचारप्रक्रिया सतत चालू ठेवावी लागते, एक उपजत सौंदर्यदृष्टी असावी लागते, प्रतिभा असावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पूर्णत्वाला पोचलेलो नाही आहोत हे भान कायम जागृत असावं लागतं.आता ही दुसरी गोष्ट फक्त hard work ने साधू शकते का? प्रामाणिकपणे सांगायचं तर मला माहीत नाही. पण मला असं वाटतं की अतिउच्च प्रतीचा संगीतकार असेल तर त्यात थोडासा नैसर्गिक देणगीचा भाग असायला लागतो.

एखादा चांगला संगीतकार होण्यासाठी तंत्रावरची हुकुमत तर आवश्यक आहेच पण पुरेशी नाही. कारण संगीतविचार प्रगल्भ नसतील तर नुसत्या तंत्राने संगीत प्रभावी होउ शकत नाही. एखादा राग कुठल्याकुठल्या काव्यरसाशी जोडला जातो, त्याचं स्वरुप कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे - तो राग लाजरा आहे की धीट आहे, धसमुसळा आहे की नाजुक आहे,. त्याचा जीव किती (किंवा तो किती वेळ रंगवता येईल) या सगळ्या गोष्टींवर संगीतकाराला अतिशय मेहनत(विचार) करावी लागते. असाच विचार फक्त राग या गोष्टीवर नसून ताल/गायकी . अनेक गोष्टींवर एकत्रितपणे करावा लागतो. हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे की हा विचार तंत्राशिवाय केला जाऊ शकतो.

संगीतकार/ साथीदार करत असलेल्या काही चुका
. केवळ फास्ट वाजवणं म्हणजेच चांगल वाजवणं असं समजणं ही पहिली चूक. ते काही वेळ बरं वाटू शकतं पण काही वेळानंतर irritating होतं. यात आजकालचे बहुतेक वाद्य वाजवणारे येतात. अगदी ज्येष्ठ आणि (तथाकथित) लोकप्रिय संगीतकारपण (वाद्यवादक) असं समजतात याचं दु: होतं.
. साथीदार म्हणजे तबलजी/संवादिनी यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ते साथ करत आहेत आणि स्वतःचं कौशल्य दाखवण्याची ही जागा नाही. ते कौशल्य त्यांनी सोलो वादनात दाखवावे. एखाद्या/दुसर्या ठिकाणी तबल्याच्या हरकती चांगल्या वाटू शकतात पण त्या जास्त झाल्यानंतर त्याला मूळ वादक तबलजी यातील हाणामारीचं स्वरूप येतं आणि मूळ रागाचा विचार अगदीच बाजूला पडतो. चांगल्या साथीदारांची उदाहरणं द्यायची झाली तर पुष्कळ आहेत. . अहमदजान थिरकवा साहेब, पं सुरेश तळवळकर, पं अरविंद थत्ते, पं अप्पा जळगावकर ही काही लगेच आठवणारी नावं. हे सर्व अतिशय मोठे कलाकार आहेत पण यांची साथ कुठेही आक्रस्ताळेपणा करता अतिशय संयत असते. यातले तबलेवाले आणि आजकालचे काही इतर leading आणि popular तबलजी आठवून बघा म्हणजे फरक जाणवेल. कधीकधी असंही जाणवतं की वादकाची तयारी कमी असल्यामुळे तो/ती तबलजीला जास्त scope देतात.
. काही वाद्य ही लोकसंगीतातून/ पाश्चात्य पद्धतीतून शास्त्रीय संगीतात आलेली आहेत याचं भान ठेवणं. दरबारी कानडा हा राग संतूरवर ऐकून मी सर्द झालो. हा राग मींडकारी/ आंदोलनातून खुलतो. संतूर या वाद्यावर दोन्ही गोष्टी प्रभावीपणे वाजवणं शक्य नाही, वाजवल्या तरी कानाला गोड वाटत नाही. आता माझ्यासारख्या सामान्य श्रोत्याला ज्या गोष्टी कळतात त्या एवढ्या मोठ्या कलाकाराला कळत नाहीत की कळूनही वळत नाहीत?
. लोकांना आवडेल तसं आपलं गाणं mold करणं. या मुद्द्या वर मुळातून वाद होउ शकतात. पण केवळ लोकांना आवडतं म्हणून एकच आलाप/तान पुन्हापुन्हा गाणं/वाजवणं यानं काय साध्य होतं?

५.एखाद्या व्यक्तीचे गुरू मोठे असतील तर त्या व्यक्ती पण मोठ्या असतील असे नाही. माझे गुरू उस्ताद अमुक किंवा पंडितजी तमुक असा सारखासारखा उल्लेख केल्याने आपण फार मोठे कलाकार होत नाही उलट जाणकारांत आपलं हसू होतं. त्यामुळे गुरूच्या नावाची पुण्याई फार दिवस टिकत नसते याची जाणीव गायक/वादकांनी ठेवावी व आपापल्या संगीतावर प्रामाणिक मेहनत करावी.


श्रोत्यांच्या काही त्रुटी :
. कुठल्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जायची वृत्ती - अर्थात हे सर्व श्रोत्यांना शक्य नाही पण कमीतकमी संगीताच्या विद्यार्थ्यांनी तरी याकडे गंभीरपणे बघायची गरज आहे. उदा. जो कोणी .रशिद खाँची स्तुती करतो त्याला मी रशिद खाँचे गुरु . निस्सार हुसेन खा साहेब ऐकण्याची शिफारस करतो. निस्सार हुसेन साहेबांची गायकी रशिद खां पेक्षा चांगली आहे त्यांचं गाणं ऐकल्यावर रशिद खाँच्या आजकालच्या गाण्यातील त्रुटी दिसतात. आजकालच्या इंटरनेटच्या युगात तर कुठलीही गोष्ट गुगलली की सापडते. इंटरनेटवर शोध घेतला तर निस्सार हुसेनखाँच्या काही recordings सापडतात, असे असताना फारच कमी जण मूळ आणि दर्जेदार गाण्याचा शोध घेताना दिसतात.

चांगल्या संगीत समीक्षकांची कमतरता :
. उठसूट कुठल्याही गाण्याला बहारदार/रंगतदार म्हटलं की त्या शब्दांना मोल रहात नाही. एखादं गाणं खराब झालं तर लिहा नं ते खराब झालं म्हणून. या वेळेस तर जवळपास सगळ्या newspapers मधे मला हे जाणवलं. मी एकदा अतिशय भिकारी गाण्याचं वर्णन बहारदार असं वाचलं आणि पुढचं परीक्षण वाचायचंच सोडून दिलं. अर्थात यात दोष रिपोर्ट लिहीणार्यांचा नसून तो newspapers चा आहे आणि कदाचित त्यांचाही नसेल कारण त्यांनाही त्यांना परवडणार्या rate मधे चांगलं समीक्षक मिळत नसेल.

या गोष्टींमुळे जो नवखा श्रोता असतो तो चुकीच्या गोष्टींना शास्त्रीय संगीत समजतो किंवा पळुन तरी जातो. change is the only constant thing असं म्हणतात. त्या न्यायाने सध्या जे शास्त्रीय संगीत आहे ते पण कुठल्यातरी बदलातून आलेलं आहे आणि ते यापुढेपण बदलत राहणार. फक्त बदल करणार्‍यांनी (किंवा आम्ही बदल करतो असं म्हणणार्‍यांनी) स्वतःच्या कुवतीचा अंदाज घ्यावा आणि मग बदल करावेत.

3 comments:

Ruminations and Musings said...

१. मी तुझ्या मुद्द्यांशी सहमत आहे. गाण्याचा वेगवेगळ्या पातळीवर अभ्यास करणे हे नॆसर्गिक असावे लागते. त्यासाठी कोणतेही ’नवनीत’ नसते.
२. ऎकलेल्या गाण्यावर विचार करणे असेही आजकाल कमी घडते. आणि ती मते मांडायलाही एक धॆर्य लागते.. जे तू दाखविले आहेस. मध्यंतरी गुलाम अली यांचा पुण्यात झालेला कार्यक्रम असाच होता. आजकाल त्यांचा आवाज बरोबर नाही व ठराविक गझल्स गाऊन वाहवा मिळवली जाते.. . गुलाम अली माझे आवडते गायक आजही आहेत. पण मला तो कार्यक्रम अजिबात आवडला नाही.
३. जाता जाता खटकलेला एकच मुद्दा - संगीतकार असा शब्द तू वापरला आहेस तिथे गायक असा शब्द योग्य वाटेल.

Mukul Joshi said...

Barobar aahe tumhi mhaNat aahat te. Mazya mate lokapriyatechi vadhati haus (khara tar haav) he ek karaN hi tya maage aahe. Savai ha ata masses cha karykram banala aahe aaNi yeNaryatale hi barech ek faD mhaNun tithe yetat. Ashanchi vahava miLavaNyasathi "purity" shi taDajoD keli jatey.

Mukul Joshi
http://mukulayan.blogspot.com

HAREKRISHNAJI said...

मी देखील सहमत आहे. आपण योग्यतेच लिहीले आहेत.

मी हल्ली थोरांमोठ्यांचा कार्यक्रमाला जाणॆ टाळतो त्या पेक्षा तरुण युवा पिढीचे गाणॆ बजावणॆ ऐकण्याला जास्त पसंती देतो. जेव्हा संगीतमार्तंड १५-२०-२५ सा्थीदारांचा लवाजमा घेवुन रंगमंचावर येतात व जवळजवळ एक तास वाद्य जुळवायला घेतात तेव्हा ते संगीत रहात नाही , ते असते एक नाट्य.

मला असे वाटते की या संगीत महोत्सवाला जाणॆ हे एक Status symbol किंवा फॅड होत चालले आहे. ्मला ही आपल्यासारखेच, जेव्हा मी कलावंतांची यादी पाहीली तेव्हा वाटले होते. यात दोन पाचच interesting नावे वाटत होती. (मी काही जाणकार नाही, तरी देखील )

संगीतविचारा बद्द्ल, बऱ्याच वेळा काहीजण त्यांच्या गुरुंची कार्बन कॉपी वाटतात.

माझा एक मित्र नेहमी सुरवातीचा आलाप, थोडेफार बिलंबीत वगैरे ऐकतो व जेव्हा लोकांना रिझवण्याचा प्रकर सुर होतो तेव्हा उठुन जातो.