Monday, September 14, 2009

समीक्षक वृत्ती

समीक्षेच्या संदर्भात आज एक चांगला परिच्छेद वाचण्यात आला. तो देण्याआधी थोडेसे

समीक्षा म्हणजे काय हे मला नक्की सांगता येणार नाही परंतु मराठीतलं समीक्षात्मक लिखाण मी थोडंफार वाचलंय. त्यावरून मी असा अंदाज करू शकतो की एखादा लेख/पुस्तक वाचताना जर कुठे काही अडलं (एखादा शब्द, शब्दांचा अर्थ किंवा काही संदर्भ) तर त्याचा पाठपुरावा करणं, कळालेली गोष्ट वेगवेगळ्या निकषांवर तपासून घेणे म्हणजे समीक्षक वृत्ती. समीक्षक ही व्यक्ती रसिक तर असतेच पण तिच्यात अभ्यासक वृत्तीही असते. काही लोकांना समीक्षा म्हणजे काथ्याकूट असं जरी वाटत असलं तरी कलाकृती समजून घेण्यास चांगली समीक्षा खूपच मदत करते.

. वा. धोंड हे एक श्रेष्ठ समीक्षक. त्यांची तीन पुस्तके वाचली आहेत आणि त्यांचे लिखाण मला आवडते. त्यांचेतरीही येतो वास फुलांनाहे बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांवरचे पुस्तक वाचले आणि मला मर्ढेकरांच्या कवितांमध्ये रस निर्माण झाला. आणि त्यांच्या या/इतर पुस्तकांनी मला त्या-त्या विषयामध्ये रस निर्माण झाला आहे किंवा वाढला आहे. धोंडांवर या महिन्याच्या (सप्टेंबर २००९) अंतर्नाद मध्ये किशोर आरस यांनी एक लेख लिहीला आहे. त्या लेखातील परिच्छेद खाली लिहीतो आहे. हा परिच्छेद समीक्षक वृत्तीसंबंधी आहे आणि समीक्षकाची अभ्यासक वृत्ती, त्याला अर्थ लागत नसल्यामुळे जाणवणारी अस्वस्थता आणि अर्थ मिळाल्या नंतरचा आनंद यातून दिसतो.

============================================

पैं हींवराची दाट साऊली सज्जनी जैसी वालिली

तैसिं पुण्ये डावलूनी गेली अभक्तांते

या ज्ञानेश्वरीतील ओवीने त्यांना (धोंडांना) अडवले. ओवीचा उत्तरार्ध सहज कळला, पण पूर्वार्ध नीट उमजेना. हिवराची सावली चांगली दाट असूनही सज्जन ती टाळतात, त्याअर्थी त्यात दुर्जनाकरिता काहीतरीगंमतनक्कीच असली पाहिजे. ती कोणती?

धोंडांना चुटपुट लागून राहिली. हिवर पूर्ण अपरिचित, म्हणून शब्दकोश ज्ञानेश्वरीचे निघंटू पाहिले. शिवाजीराव भावे यांचाज्ञानेश्वरी कोशन्याहाळला. समाधान होईना. मग ते वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापकांना भेटले. प्रा. धोंड म्हणतात, ’ते तर बिचारे माझ्याहूनही निष्पाप! त्यांना हिवराची सावली टाळायची असते हे तर ठाऊक नव्हतेच, पण हिवरही ठाऊक नव्हता.’ या काळात प्रा. धोंड आमच्या साहित्यसहवासमध्ये लावलेल्या असंख्य झाडांकडे तासनतास टक लावून पाहत उभे असल्याचे दृश्य सर्व रहिवाशांना दिसत असे. पुढे नागपूर विद्यापीठात ते काही कामाकरिता गेले असता १८ वर्षे वयाच्या एका मुलाने हिवराचे झाड त्यांना दाखवले. ’अकॅशिया ल्यूकोफ्लॉइआहे हिवराचे लॅटिन नाव असल्याचे त्यांना समजले. हिवर भेटला, पण त्याच्या सावलीला सज्जन का बसत नाहीत, हे कळले नाही. पुन्हा एकदा ते ग्रंथाला शरण गेले. जॉर्ज वॅटचाडिक्शनरी ऑफ इकॉनॉमिक प्रॉडक्टस ऑफ इंडियाहा बृहद ग्रंथ पाहत असतानाहिवराची साल दारूकरता तयार केलेल्या रसायनात घातली तर ते लवकर फसफसते, त्यातील गाळ खाली बसातो आणि त्याला चांगला स्वाद येतो. म्हणून हिवरालाशराब की कीकरअसेही नाव आहे हे कळून आले आणिसज्जनहिवराच्या सावलीला का बसत नाहीत, याचा तत्काळ उलगडा झाला.

No comments: